वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 148. तीर्थावळी

सुख सेजेवरि देव विश्

🙏 4. संत नामदेव · ABH-081614 · अभंग क्र. ९५५

955.
सुख सेजेवरि देव विश्रांति पहुडले | विश्रांतीसी गेले सकळ भक्त ॥१॥
ब्रह्मवीणा करी घेऊनि ब्रह्मसुत | जाणवी एकांत नारदमुनी ॥२॥
बाप पंढरीनाथ सुखाचा सुखर्सिधु | नित्य नवा आनंदु सोहळा करी ॥३॥
विश्रांति विसांवा जे विश्वमंगळ | ते नाम निर्मळ विठोबाचे ॥४॥
तो भक्तशिरोमणी वैराग्य पुतळा | गातो प्रेमकळा धरुनी कंठी ॥५॥
तेणे श्रवणामृते हृदय कोंदाटले | प्रेमाचे सुटले पाझर नयनी ॥६॥
हर्षे निर्भर 'दोनी देव नारदमुनी | प्रीति आलिंगनी एकमेका ॥७॥
जाती चंपक सुमने माजी तुळसीमिश्रित | दिधल्या त्या उचित कंठी माळा ॥८॥
नमस्कार करुनि केले विसर्जन | भरल त्रिभुवन ब्रह्मरसे ॥९॥
मग चालिले तेथोनि ऋषी नारदमुनी | हृदयी संजीवनी कृष्णनाम ॥१०॥
तेणे त्या विश्रांती नित्य तृप्ती मनी | नामा जीवे चरणी विनटला ॥११॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग