ॐ कार हे मुळ सर्वांच
958.
ॐ कार हे मुळ सर्वांचे जाणावें । तेथुनी पहावे वेदशास्त्र ॥१॥
नमन करावे कुळदैवतांसी । मातापितरांसी सर्व भावे ॥२॥
मस्तक ठेवावे संतांचे चरणी । सदा वसो वाणी शिवनाम ॥३॥
शिव शिव ऐसे उच्चारावे मुखें । जन्ममरण दुःखे नासताती ॥४॥
वाया जाऊ देऊं नये एक क्षण । भक्तीचे लक्षण जाणावें हे ॥५॥
यमधर्म त्याचे पाय पै वंदित । एका जनार्दनी नित्य नाम गाय ॥६॥
