हृदयी परमात्मा नांदे
953.
हृदयी परमात्मा नांदे परिपुर्ण । तो शिव सनातन पूर्णब्रह्मा ॥१॥
जीव तो गुंतला विषयाचे लक्षी । शिव सर्वसाक्षी परब्रह्मा ॥२॥
भाव अभावना जया जैसी पाही । एका जनार्दनी देही परब्रह्मा ॥३॥