ज्ञान वैराग्य कावडी
965.
ज्ञान वैराग्य कावडी खांदी । शांति जीवन तयामधी ॥१॥
शिवनाम तुम्ही घ्या रे । शिवस्मरणी तुम्ही रहा रे ॥२॥
हरिहर कावड घेतली खांदी । भोवती गर्जती संतमांदी ॥३॥
एका जनार्दनी कावड बरी । भक्ति फरारा तयावरी ॥४॥