वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 148. तीर्थावळी

कृपेच्या सागरे भक्‍त

🙏 4. संत नामदेव · ABH-081571 · अभंग क्र. ९७०

970.
कृपेच्या सागरे भक्‍तकरुणाघने | देऊन आलिगने निवविले तयाते ॥१॥
सर्वज्ञाचा रावो आत्मा ज्ञानदेवो | सांगेल अनुभवो तुम्हांप्रती ॥२॥
ते खुण अंतरी धरा सर्वभावे | दृढ धरोनि जीवे जतन करा ॥३॥
न लगे तीर्थाटन काया क्लेश जाण | न लगे अनुष्ठान करणे बहु ॥४॥
न लगती सायास करणे उपवास | धरावा विश्‍वास संतसंगे ॥५॥
न लगे वज्रासनी बैसावे नेहटी | न लगे गिरिकपाटी करणे वास ॥६॥
न लगे उग्रतप नानामंत्र जप | भेणे जाय पाप संतसंगे ॥७॥
लगे भस्म उधळणे वाहणे जटाभार | न घालावा पसार लोकाचारी ॥८॥
सर्वभूती करुणा जिव्हे नामस्मृती | मन येईल निवृत्ति आपेआप ॥९॥
क्रियाकर्मधर्म प्रेमेविण खटपटा | करिता आला वीट दीर्घ दोषाचा ॥१०॥
साधनावांचुनी मार्ग सोपा जाण | करावे कीर्तन रामकृष्ण ॥११॥
सर्वकाळ कथा संतांची संगती | वाचे नाम कीर्ति सर्वकाळ ॥१२॥
तो हा राजमार्ग सर्वांहोनी चांग | सदा संतसंग वाचे नाम ॥१३॥
संकल्प विकल्प न धरावे मानसी | मनोभावे संतांसी शरण जावे ॥१४॥
ज्ञानदेव म्हणे पुढती ऐका एक | सांगेन प्रत्यक्ष अनुभव सिद्ध ॥१५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग