पाप तया नांव परदाराग
971.
पाप तया नांव परदारागमन ।
पाप ते परधन अपहार ॥१॥
पाप तेचि निंदा परपीडा व्देष ।
पाप तेचि उपहास पुढिलाचे ॥२॥
पाप तेचि जीवी विषयाची आसक्ति ।
पाप अभक्ती कुळाचारी ॥३॥
निळा म्हणे पाप मुख्य तेचि साचे ।
नावडे देवाचे नाम मुखी ॥४॥
