मन हे ओढाळ । सदा करी
967.
मन हे ओढाळ । सदा करी तळमळ ॥१॥
तयालागीं स्थिर करी । चित्ती महादेव धरी ॥२॥
तरी तुज होय सुख । येर अवघे ते दुःख ॥३॥
चित्तींची वासना । जंव नाही गेली जाणा ॥४॥
एका जनार्दनी मन । असो द्यावे समाधान ॥५॥
967.
मन हे ओढाळ । सदा करी तळमळ ॥१॥
तयालागीं स्थिर करी । चित्ती महादेव धरी ॥२॥
तरी तुज होय सुख । येर अवघे ते दुःख ॥३॥
चित्तींची वासना । जंव नाही गेली जाणा ॥४॥
एका जनार्दनी मन । असो द्यावे समाधान ॥५॥