वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 148. तीर्थावळी

वेदाचे हे सार वैराग्

🙏 4. संत नामदेव · ABH-081573 · अभंग क्र. ९७२

972.
वेदाचे हे सार वैराग्याचे जीवन | चिदाकाशिंची खूण परम गुज ॥१॥
जे शुद्धज्ञान गुह्य मोक्षमुक्ति बीज | सकळ मंत्रराज मंगलनिधी ॥२॥
ते या नामयाचे होते हृदयकमळी | कथा भूमंडळी प्रकट केली ॥३॥
हे हे विठ्ठलनाम साराचे पै सार | कलियुगी उद्धार सकळ जना ॥४॥
जे श्रवणाचे श्रवण मननाचे मनन | जे निजध्यासन निजध्यासाचे |॥५॥
जे विचाराचे सार वृत्तीचा निर्धार | स्वरूप साक्षात्कार उघडा केला ॥६॥
|जे भक्तीचे सौभाग्य ज्ञानाचे आरोग्य | शास्त्राचे ते चांग मथित नाम ॥७॥
नामापरते थोर नाही पै आणिक | जनांसि तारक हेचि एक ॥८॥
जे सकळ धर्म जनक पवित्राचे पावन | जे का अधिष्ठान आनंदाचे ॥९॥
जे योगसिद्धीचे जीवन पीयुष | जेणे पूर्ण आयुष्य कामनेचे ॥१०॥
पुण्यपावन देवा भक्तांचे सोहळे | प्रत्यक्ष गळाले आनंदाचे ॥११॥
भक्तिभावे याचे करिता श्रवण | मग नाही दर्शन गर्भवासा ॥१२॥
म्हणोनि कीर्तन करावे आवडी | घ्यावी अर्थगोडी अनुभवे ॥१३॥
नव्हे हे प्राकृत पाठांतर कवित्व | हा उपनिषद मथितार्थ ब्रह्मरस ॥१४॥
जाणीव शहाणीव न करावी सर्वथा | न पहावी योग्यता व्युत्पत्तीची ॥१५॥
हे सात्विकाचे धन भोक्ते संतजन | नामदेवे पूर्ण ग्रंथ केला ॥१६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग