वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 148. तीर्थावळी

समस्त भक्तमंडळीसहित

🙏 4. संत नामदेव · ABH-081593 · अभंग क्र. ९५४

954.
समस्त भक्तमंडळीसहित वनमाळी | प्रवेशले राउळी परमानंदे ॥१॥
राही रखुमाई सत्यभामा वेगी | देवाते अष्टांगी नमस्कारिती ॥२॥
बाप सुखसिंधु स्वामी आर्तबंधु | प्रीति परमानंदु निजभक्ता ॥३॥
सत्यभामेने केले प्रक्षाळण चरणा | रुक्माई विंजना जाणविती ॥८॥
विडा देती राही उभी उजव्या बाही | दृष्टी ठेवुनि पायी कवळी मने ॥५॥
शुक सनकादिक नारद तुंबर | करती जयजयकार नामघोषे ॥६॥
आले बंदीजन पढती ब्रीदावळी | ध्यान हृदयकमळी चंद्रचूडा ॥७॥
निवृत्ती ज्ञानदेव सोपान सांवता | जवळी त्या जनमित्रा बोलाविले ॥८॥
सकळिक संता परमानंदे तृप्ती | सारोनि श्रीपति आरोगणा ॥९॥
बैसोनि एकांती पंढरीचा राणा | करितसे विचारणा निजभक्तांसी ॥१०॥
सकळिक ब्राह्मण आणावे भोजना | निरसावी वासना संदेहाची ॥११॥
उठोनि प्रातःकाळी यावे शीघ्चवत | द्यावया अक्षत ब्राह्मणांसी ॥१२॥
निजबोधे आनंदे हर्षे खेळेमेळे | भोगावे सोहळे स्वानंदाचे |॥१३॥
फेडवी तयांची भेदभ्रमदृष्टी | द्यावी तया भेटी निजरूपाची ॥१४॥
|संतसंगतीचा प्रगट व्हावा महिमा | द्यावा भक्तिप्रेमा नामयासी ॥१५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग