वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 3. ज्ञानकांड रुपके › १९, कापडी अभंग ९६९ ते ९७०

ॐ नमो शिवा आदि ।

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074730 · अभंग क्र. ९७०

970.
ॐ नमो शिवा आदि ।
कावडी घेतली खांदी ।
मिळाली संतमांदी ।
त्याचे चरणरज वंदी रे ॥धृ॥
शिवनाम शीतळमुखी ।
सेवी पा कापडिया रे ।
दडदडदडदड दुडुदुडुदुडुदुडु ।
पळ सुटला कळिकाळा बापुडीया रे ॥१॥
गुरूलिंग जंगम ।
त्याने दाविला आगम ।
आधिव्याधि झाली सम ।
तेणे पावलो विश्राम रे ॥२॥
जवळी असता जगजीवन ।
का धांडोळिसी वन ।
एकाग्र करी मन ।
तेणे होईल समाधान रे ॥३॥
देहभाव जेथे विरे ।
ते साधन दिधले पुरे ।
बापरखुमादेविवरे विठ्ठलु रे विठ्ठलु रे विठ्ठलु रे ॥४॥

अर्थ :
ॐकार स्वरूप आदिशंकराला नमस्कार असो ज्यांनी समतारूपी कावड खांद्यावर घेतली आहे असे जे संत समुदाय त्यांच्या चरणधुलीस मी वंदन करतो श्रीशंकराचे शांती देणारे नाम तोंडी ठेवून या संतांची सेवा करा. अशी सेवा केली म्हणजे बिचाऱ्या यमाला दुडु दुडु करीत (त्वरेने) पळच काढावा लागेल. ब्रह्मज्ञानसंपन्न अशा जंगम गुरूंनी वेदांतील महावाक्याचा उपदेश केल्यामुळे माझी शारीरिक व मानसीक दुःखे नाहीसी झाली. त्यामुळे मला यथार्थ समाधान झाले. असा जगजीवन परमात्मा जवळ हृदयांतच असता तुम्ही रानोमाळ का फिरता? तुम्ही आपले चित्त स्थिर करा म्हणजे सहजच समाधान लाभेल. देहभाव नाहीसा होऊन समाधान प्राप्त होते. असे हे मन एकाग्र करण्याचे साधन माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांनी आम्हाला दिले. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग