म्हणोनि याचिया श्रवण
964.
म्हणोनि याचिया श्रवणे पाठे ।
वचने पालटे देहबुध्दी ॥१॥
वैराग्याची राणीव जोडे ।
ज्ञानाचे उघडे निजमंदिर ॥२॥
नवविधांचे नाना भोग ।
वसविती अंग येऊनिया ॥३॥
निळा म्हणे भक्ति मुक्ति ।
शांति विरक्ति वरती त्या ॥४॥
964.
म्हणोनि याचिया श्रवणे पाठे ।
वचने पालटे देहबुध्दी ॥१॥
वैराग्याची राणीव जोडे ।
ज्ञानाचे उघडे निजमंदिर ॥२॥
नवविधांचे नाना भोग ।
वसविती अंग येऊनिया ॥३॥
निळा म्हणे भक्ति मुक्ति ।
शांति विरक्ति वरती त्या ॥४॥