वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 148. तीर्थावळी

तंव म्हणती नारदमुनि

🙏 4. संत नामदेव · ABH-081584 · अभंग क्र. ९५९

959.
तंव म्हणती नारदमुनि परियेसी वो माते | सांगेन मी तूते सत्य मानी ॥१॥
हा निर्विकल्प देव येतसे रूपा | करावया कृपा भक्तजना ॥२॥
हा शरणांगता वत्सलु अनाथा कृपाळू | मिरवी दीनदयाळू ब्रीद जगी ॥३॥
जो शब्दब्रह्मजनिता सकळ विधिकर्ता | धर्माचा पाळिता पक्षपाती ॥४॥
म्हणोनि जन्मकर्म असंख्यात जगी | केली याचलागी नारायणे ॥५॥
अंबऋषिचे येणे सोसले गर्भवास | राखितो उदास वळिचे द्वार ॥६॥
विकिला पाइकु कायामने वाचा | जांला पांडवांचा मोलेविण ॥७॥
गोकुळी नंदाची राखिली गौधने | प्रीति उच्छिष्ट खाणे गौळियांचे ॥८॥
विघ्न पडे तेथे आपणा वोडवी | संकटी सोडवी माझी म्हणोती ॥९॥
सांडोनि अभिमान न्यून कामे करी | जालासे अधिकारी दास त्याचा |॥१०॥
आज्ञा वाहे शिरी जीवी जतन करी | मानिली सोयरी जिवलगे ॥११॥
एके अपमानिती दावेवरी बांधिती | उपहास करिती हर्ष मानी ॥१२॥
केले अपरांध नेघे अपुले चित्ती | दुणावितो प्रीति नित्य नवी ॥१३॥
ऐसे ब्रह्मांडनायकु देवा मुगुटमणी | हे त्याची करणी ख्याती जगी ॥१४॥
आम्ही सकळ भकत याचे पूर्ण अंशु |'चरणींचा सौरसु नामयासी ॥१५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग