वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 148. तीर्थावळी

मग नारदाते पुसे सत्य

🙏 4. संत नामदेव · ABH-081578 · अभंग क्र. ९५८

958.
मग नारदाते पुसे सत्यभामा देवी | विस्मयो माझ्या जीवी अति वाटे ॥१॥
सांडोनिया थोरी देव मुगुटमणी | नाचतो कीर्तनी संतांपुढे ॥२॥
तरी कोणिये जन्माचे काय काय याचे | घेतले नाम्याचे ऋण देवे ॥३॥
एका पुंडलिकाचेनि पांगे येणे हो श्रीरंगे | अह्टावीस युगे उभ्या गेली ॥४॥
न पाहे परतोनी अझुनी पाठिमोरा | न बोले निष्ठुरा वचन कांही ॥५॥
तरी कोण प्रीति देवा कोण्या ऋणानुबंधे | राखितो आनंदे बळिचे दार ॥६॥
विकिला पायिक कायामने वाचा | जाला पांडवांचा वेळाइतु ॥७॥
जे जे जया आवडे ते ते धरोनी रूप | पाववी संकल्प सिद्धी त्यांचे ॥८॥
एकला एकटु एकलेनि जीवे | भक्तांचे करावे सकळ काज ॥९॥
ऐसे भक्त अपार आहेत भूमंडळी | किती लागावळी असेल त्यांची ॥१०॥
म्हणोनि माझ्या जिवी वाटे थोर खंती | स्वामीते शिणविंती युगायुगी ॥११॥
भक्तांचे आवडी त्यजिले वैकुंठभुवन | चित्ती अमृतपान न वाटे गोड ॥१२॥
अखंड आवडे संतांची संगती | बैसोनि एकांती घेती सुख ॥१३॥
ऐसी इही चाळविले वैष्णवी | आमुचे घर गोसादी भुलविले ॥१४॥
त्या सकळांहुनि पढियंता देवा एकु नामा | भक्तिभावे प्रेमा दिधला त्यासी ॥१५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग