वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 148. तीर्थावळी

निवृत्ति ज्ञानेश्‍वर

🙏 4. संत नामदेव · ABH-081590 · अभंग क्र. ९६६

966.
निवृत्ति ज्ञानेश्‍वर सोपान सांवता | जनमित्र पढियंता जिवलगू ॥१॥
आसंद सुदामा विसोबा खेचर | नरहरी सोनार आदिकरुनि ॥२॥
बाप आर्तबंधु कृपाळू दीनांचा | अभिमान भक्तांचा न संडी कदा ॥३॥
चोखामेळा बंका भक्तवत्सल लाडका | तो बोलविला देऊ आरोगणे ॥४॥
वैराग्याचा मेरु तो गोरा कुंभार | आवडता डिंगरू केशवाचा ॥५॥
ऐसे थोरसाने सकळ भकत राणे | देवे आरोगणे बोलावले ॥६॥
सधूप आणि दीप तुळशीच्या माळा | पूजिले सकळा देवराये ॥७॥
तंव राही रखुमाबाई सत्यभामा सती | विस्तारोनि आणिती विविध बोणी ॥८॥
भोंबती भक्तमंडळी मध्ये वनमाळी | शोभे नभमंडळी चंद्र जसा ॥९॥
सकळांमुखी कवळ देतसे निजकरे | उच्छिंष्ट पितांबरे सांवरितो ॥१०॥
त्या सुखाचा पारु देखोती वैकुंठी | होती लूलूमिठि सुखराशी ॥११॥
ऐसे ते भोजन जाले खेळेमेळे | ब्रह्मरसे धाले सकळ भक्त ॥१२॥
तंव बिमाने आकाशी दाटले सकळ | करिती कल्लोळ पुष्पवृष्टी ॥१३॥
ते देखोनी द्विजवर पडिले चिंतवणी | म्हणती पै जाली हानी जीवित्वाची ॥१४॥
नव्हे हा ज्ञानमार्ग नव्हे हे वैराग्य | नवल भक्तिभाग्य आवडीचे ॥१५॥
एक म्हणती हा पांडुरंग होय साचे | येव्हढे भाग्य कैचे मानविया ॥१६॥
हा नव्हे गुणिवंतु क्रियाकर्मातीतु | यासी प्राय:श्चितु काय घडे ॥१७॥
नाही यासी आप नाही यासी पर | नाही या आचार जातिकूळ ॥१८॥
षडमार्ग संबंध नाही याच्या ठायी | विकल्पाचे नाही वळण कदा ॥१९॥
कृपेचा कोंवळा सोयरा दीनांचा | उदार मनाचा लोभापर ॥२०॥
अनुसरे त्याचे मायाजाळ तोडी | बसणे तो मोडी संसाराचे ॥२१॥
या नामयाची माता आम्हा तुम्हा देखता | शिणली वेवादता नानापरी ॥२२॥
नेदी तिच्या हाती घातिला पाठीसी | धरिला जीवेंसी माझा म्हणुनी ॥२३॥
देहाचा विसरु याच्या रुपाच्या दर्षाने | चरणाचेनि स्मरणे चित्त निवे ॥२४॥
सुख गोष्टी यासी केलिया एकांत | तेणे पुरतसे आत जन्ममरणा ॥२५॥
ऐसे त्याचे बोलणे ऐकोनि पंढरिनाथे | दिले सकळिकांते अभयदान ॥२६॥
मग निजरूप दाविता जाला तयावेळी | नामा हृदयकमळी आलिंगिला ॥२७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग