वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 141. चोवीस नामांचा महिमा

येई वो केसरी नरसिंह

🙏 4. संत नामदेव · ABH-083584 · अभंग क्र. ६३९

639.
येई वो केसरी नरसिंह उच्चारी | पवित्र साचारी तिही लोकी ॥१॥
नरसिंह वामन प्रल्हादरक्षण | आमुचे ते धन नाम तुझे ॥२॥
शंखचक्र करी पावे वो लवकरी | येई तू केसरी लवलाहे ॥३॥
नरसिंह हे नाम नरसिंह हे प्रेम | उत्तम उत्तम तिन्ही लोकी ॥४॥
त्रिपुररक्षक दानवमर्दन | विकट वदन पंचाक्षरी ॥५॥
नामा म्हणे हरि नाम नरकेसरी | नरसिंह उच्चारी तरती जीव ॥ ६

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग