आजी नीलवर्ण कुसुमसम
631.
आजी नीलवर्ण कुसुमसम । देखिला मेघ शाम विटेवरी ॥१॥
अतसीकुसुम रंग रंगला श्रीरंग । भोंवाता शोभे संग संतजन ॥२॥
निळीय भासत तो रंग दिसत । शामंकित शोभत विठ्ठल देव ॥३॥
एका जनार्दनी नीलवर्ण रुपडें । पाहता चहुकडे कोंदाटले ॥४॥