वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 141. चोवीस नामांचा महिमा

येई वो अनिरुद्धे सां

🙏 4. संत नामदेव · ABH-083563 · अभंग क्र. ६३६

636.
येई वो अनिरुद्धे सांवळे प्रबुद्धे | विराटे गोविंदे पाव वेगी ॥१॥
त्राहे माउलीये मना तुझी सोय | चुकती अपाय नाम घेता ॥२॥
अनिरुद्ध पाठे जाईन वैकुंठे | पुंडलिक पेठे उभा असे ॥३॥
कटावरी कर सांवळी सुंदर | मनाचा विचार इच्या चरणी ॥४॥
अनिरुद्धसार अनु नाही आधार | सर्वही विचार अनिरुद्धे ॥५॥
नामा म्हणे येई अनिरुद्धे माये | आणिक उपाय नलगे मज ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग