वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ४, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६०२ ते ७०१

अंजनी अंजन साधिले नि

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074392 · अभंग क्र. ६३२

632.
अंजनी अंजन साधिले निधान ।
द्वैताद्वैत धन विज्ञानेसी ॥१॥
सारिलेसे द्वैत अद्वैत सकळ ।
निर्गुण निर्मळ निवळले ॥२॥
साध्य साधक वस्तु आलिया हाता ।
मुरडोनी पाहता वस्तुमय ॥३॥
ज्ञानदेवी साध्य अज वस्तूंचे ।
देही देह साचे नुरे तरी ॥४॥

अर्थ :
बुद्धीरूप नेत्रामध्ये द्वैताद्वैतात एकरूपाने असलेले जे ब्रह्म त्याच्या निःसंदेह ज्ञानाचे डोळ्यांत अंजन घालून मोक्षरूपी निधान म्हणजे ठेवा मी स्वाधीन करून घेतला. व त्यामुळे द्वैत व अद्वैत यांचा सर्वतोपरी निरास होऊन (अह ब्रह्मास्मि वृत्तिचाही लय होऊन) निर्गुण अशी वस्तु माझ्या अनुभवास निःसंदेहपणे आली. मुमुक्षुच्या हातांत साध्य जी परमात्म वस्तू ती आत्मत्त्वाने आली असता तो मुमुक्षु आपल्या दृष्टीचे बर्हिमुखत्त्व टाकून अंतर्दृष्टीने पाहू गेले असता त्यास सर्व परमात्म रूपच दिसते. अज म्हणजे परमात्म वस्तू ती याच देहात साध्य झाली आहे. म्हणून देहाला सत्यत्व तरी कोठून राहणार? असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग