वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ४, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६०२ ते ७०१

पुरे जरी म्हणो तरी अ

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074369 · अभंग क्र. ६३६

636.
पुरे जरी म्हणो तरी अमित्य पुरला ।
पुरोनिया उरला तेजःपुंज वो माय ॥१॥
ज्ञानाचे खाणी माणिके निर्वाणी ।
लाधले मी निर्गुणी निरालंबी वो माय ॥२॥
आत्मत्वाचिया परी खेवणिली भूषणे ।
ते मी आवडीचे लेणे लेईले वो माय ॥३॥
हा सुजडु जडला विटेसी लाधला ।
त्या रखुमादेविवरा विठ्ठला मी न्याहाळी वो माय ॥४॥

अर्थ :
परमात्म्याच्या एका अंशावर जगत आहे. हे गीतेच्या दहाव्या अध्यायाच्या शेवटी सांगितले आहे. यावरुन परमात्मा जगताचे बाहेर अनंत अंशाने उरलाच आहे. जगतांत परमात्मा पूर्ण भरला आहे असे म्हटले तरी त्याहीपेक्षा तो अमित्य' म्हणजे अपरिमित 'स्वप्रकाश' म्हणजे पूर्ण ज्ञान स्वरुपाने आहेच. त्याच्या स्वप्रकाश ज्ञानाच्या खाणीत मोक्षासारखी माणिक मला मिळाली. आणि आपल्या स्वताच्या आश्रयावर असणाऱ्या सच्चिदानंद परमात्मा स्वरुपास मी मिळालो. आता मी आपल्या स्वरुपावर आकाशादि प्रपंचाची भूषणे. आनंदाने धारण केली आहेत. त्यामुळे माझ्या स्वरुपाला प्रपंचापासून काही एक धक्का लागणार नाही. ज्यांच्या स्वरुपाशी मी एकरुप झालो. ते रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल, यांना मी आनंदाने पाहात आहे असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग