काळे ना सांवळे गोरें
638.
काळे ना सांवळे गोरें नापिवळें । वर्ण व्यक्ति वेगळें विटेवरी ॥१॥
आनंद स्वानंद नित्य परमानंद । आनंदाचा कंद विटेवरी ॥२॥
निगुण सगुण चहु वांचावेगळा । आदि अंत पाहता डोळा न दिसे कांही ॥३॥
एका जनार्दनी देखिला तो डोळा । त्रिगुणा वेगळा विटेवरी ॥४॥
