वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ४, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६०२ ते ७०१

सायुज्य सदन शामाचिये

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074365 · अभंग क्र. ६४४

644.
सायुज्य सदन शामाचिये घरी ।
हृदय कल्हरी शामतनू ॥१॥
सचेत अचेत नित्यता विरक्त ।
असोनी अलिप्त जन्ममरणा ॥२॥
नारायण साध्य साधक साधिता ।
विग्रहपूर्णता अंगी लागो ॥३॥
ज्ञानदेवी मौनी गुणग्रास धाम ।
सर्वत्र आराम हरि माझा ॥४॥

अर्थ :
शामसुंदर श्रीकृष्ण परमात्म्याच्या ठिकाणीच सायुज्य मुक्तिचे घर आहे. तोच माझ्या हृदय कमळांतही आहे. जड चेतन पदार्थ त्याचे ठिकाणी भासणारी नित्यता आणि त्या विषयासंबंधी उत्पन्न होणारे वैराग्य हे सर्व त्याचे ठिकाणी असून पुन्हा तो जन्ममरणदि धर्मापासून अलिप्त आहे. साधक नारायणाला ध्यान करुन घेत असता तो नारायणच त्याला ध्यानाकरता मूर्तरुप धारण करतो. ज्याच्या स्वरुपाचे वर्णन करता येत नाही. म्हणजे ज्याच्याबद्दल मौन धरावे लागते असा तो सर्वगुणनिधान माझा श्रीहरि परमात्मा सर्वत्र भरला आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग