येई तू उपेंद्रे विठ्
642.
येई तू उपेंद्रे विठ्ठल महिंद्रे | देवामाजी भद्रे सिंहासनी ॥१॥
त्राहे वो जननी शिणलो गे माये | तुजविण आहे कवण मज ॥२॥
तू माझे कारुण्य प्रत्यक्ष सौजन्य | विचारिता प्रवीण प्रबुद्ध हो ॥३॥
पावे वो तू वेगी उपेंद्रे गे माते | पुंडलिक सांगाते पंढरीसी ॥४॥
दीपकु लाविला दिन उगवला | दीपके फळला पांडुरंग ॥५॥
नामा म्हणे नाम उपेंद्र ऐसे शम | पावेन विश्राम नाम घेता ॥६॥
