ऊंचा उंचपणा नीचा नीच
637.
ऊंचा उंचपणा नीचा नीचपणा । ते नाही कारण विठ्ठलभेटी ॥१॥
उंच नीच याती असो भलते जाती । विठ्ठल म्हणता मुक्ती जड जीवा ॥२॥
उभारुनि बाह्मा कटी कर उभा । एका जनार्दनी शोभा विटेवरी ॥३॥