वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 141. चोवीस नामांचा महिमा

येई वो दामोदरे पवित्

🙏 4. संत नामदेव · ABH-083565 · अभंग क्र. ६३२

632.
येई वो दामोदरे पवित्र हे करे | मना हो नावरे प्रेमलोट ॥१॥
पाहे कृपादृष्टी साहे जगजेठी | पूर्ण पान्हा घोटी ऐसे करी ॥२॥
दामोदरे नाम मदन परिकरे | हाचि वो विचार मने केला ॥३॥
येई तू निर्धारे पावे तू झडकरी | येई वो लवकरी दामोदरे ॥४॥
दामोदर माता पाहे वो समता | पावे वो निवांता पावे वेगी ॥५॥
नामा म्हणे लोटू प्रेमामृत निवटू | नामेंचि वैकुंठे दामोदरे ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग