वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ४, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६०२ ते ७०१

न गणवे परिमाणे न बोल

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074368 · अभंग क्र. ६३४

634.
न गणवे परिमाणे न बोलवे अनुमाने ।
तो सहज निर्वाणी ज्ञाने फळला वो माय ॥१॥
मुक्ताची साऊली मजवरी पडली ।
ढेसी ढेसी वोल्हावली अमूर्तधारी वो माये ॥२॥
तेथे एक नवल वर्तले वो साजणी ।
सांगता मिठी मौनी पडली वो माय ॥३॥
ऐसा परोपरी फळला दिव्यरूपे फावला ।
तो रखुमादेविवरू जोड़ला वो माय ॥४॥

अर्थ :
ज्या परमात्म्याचे कोणत्या परिमाणाने मोजमाप करता येत नाही किंवा अनुमान प्रमाणानेही त्याचे वर्णन करता येत नाही. अशा परमात्म्यावर बुद्धि संबंधाने जीवभाव आला आहे. तो जीव मूळचा परमात्मरूप आहेच तो श्रीगुरूच्या उपदेशाने माझ्या रूपानेच मला प्राप्त झाला. तो परमात्मा आत्मत्वाने प्राप्त झाला याचा अर्थ मुक्त अवस्थेची छाया मजवर पडली 'ढेसी ढेसी' म्हणजे हळू हळू त्या अमूर्त परमात्म्याचे अमृत धारा मजवर पडल्यामुळे अंतःकरण वोल्हावले म्हणजे आनंदरूप झाले. ह्या स्थितीत अशी एक मौज होते की याचा अनुभव सांगू म्हटले तर मौनाची मिठी पडते. म्हणजे वाणी पांगुळ होते. अशा तऱ्हेचा दिव्य स्वरूप रखुमादेवीचे पती जो श्रीविठ्ठल तो आम्हाला प्राप्त झाला असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग