येई तू प्रदुम्ने ध्य
635.
येई तू प्रदुम्ने ध्यान तू धरणे | माझिये कल्पने निर्धारुसा ॥१॥
त्राहे झडकरी पावे वो लवकरी | प्रदुम्ने फुत्कारी वेळोवेळा ॥२॥
सावळे सुंदरे वेणु वाहे करी | ध्यान हे सुंदरी यमुना तटी ॥३॥
प्रवाह प्रदुम्ने नामघोष दाट | जिंकिले जुनाट पापराशी ॥४॥
नामा म्हणे नाम धन्य हे प्रदुम्न | होईल संपन्न नाम घेता ॥५॥
