अनादि सांवळा देखियेल
630.
अनादि सांवळा देखियेला डोळा । मनु माझा वेधिला सांगु काय ॥१॥
जीवाविरहित जाले देह हारपलें । शिवपणें गुंतले गुरुकृपें ॥२॥
जे शब्दासी नातुडे वैखरीयेसी कानडे । ते रुप उघडे पंढरीयें ॥३॥
एका जनार्दनी जीवींचे जीवन । विठ्ठल निधान विटेवरी ॥४॥
