वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 141. चोवीस नामांचा महिमा

येई तू कृपाळे संकर्ष

🙏 4. संत नामदेव · ABH-083556 · अभंग क्र. ६३३

633.
येई तू कृपाळे संकर्षण माटे | पवित्र पूर्णभरिते गुणनिधि ॥१॥
त्राहे त्राहे वेगी पावे वो झडकरी | ब्रीद चराचरी वर्णिताती ॥२॥
संकर्षण गंगा सर्वांगी तू असे | जनी वनी दिसे रूप तुझे ॥३॥
कटावरी कर सांवळी सुंदर | मनाचा विचार इच्या चरणी ॥४॥
निर्धारू सांगता व माये वो घेता | संकर्षण माता पाव वेगी ॥५॥
विष्णू संकर्षण नाम हे गहन | पतितपावन चरणरजे ॥६॥
नामा म्हणे माय संकर्षण गाय | हरिदासा पाल्हावे पंढरीसी ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग