वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १३. करुणापर अभंग व देवापाशी मागणें

केव्हा भेटी देसी जिव

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088848 · अभंग क्र. ६३१

631.
केव्हा भेटी देसी जिवाच्या जीवना ।
सुखाच्या निधाना पांडुरंगा ॥१॥
वोरसले मन नित्य वाट पाहे ।
नयनी नीज नये दिवसरात्री ॥२॥
आला जातो दिवस मास घटिका पळ ।
प्राण हा विव्हळ तुजलागी ॥३॥
हुरहुरी चित्त सदा उत्कंठित ।
न पुरोचि हा हेत चिता वाटे ॥४॥
केव्हा येईल सार्थकाची वेळ ।
येसी कृपाळ धावोनिया ॥५॥
निळा म्हणे आता न लावावा उशीर ।
भेटोनी अंतर निववारे ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग