वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 141. चोवीस नामांचा महिमा

येई वो पद्मनामे पंकज

🙏 4. संत नामदेव · ABH-083581 · अभंग क्र. ६३१

631.
येई वो पद्मनामे पंकजलोचने | विश्व पूर्णधने देखे तुज ॥१॥
त्राहे पद्मनाभा वाचा सिद्ध पावे | मज हे नुगवे मायाजाळ ॥२॥
पद्मांकित रेखा पद्म हे सुरेख | पावे वो निमिष्य एक माये ॥३॥
विचरे हे पृथ्वी नाम पद्मनाभ | स्वयंभावो बिंब विठ्ठलेसी ॥४॥
रिकामा मी नसे दिननिशी निमिष्य | पद्मनाभ साक्ष हृदयी भोगी ॥५॥
नामा म्हणे पद्मनाभ हेंचि हो नाम | जपतुसे प्रेम देई मज ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग