वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ४, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६०२ ते ७०१

ज्ञाने ध्यान पटी तंत

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074302 · अभंग क्र. ६४०

640.
ज्ञाने ध्यान पटी तंतु पै मनाचा ।
हरिरुप वाचा सारीपाठ ॥१॥
स्वरुप कामारी वागपुष्प चारी ।
विरुळा मापारी जाणे खूण ॥२॥
त्रिगुण सवडी घालुनी उलथी ।
एकरुप पंक्ति जेवी नरु ॥३॥
ज्ञानदेवी घर तत्त्वता निर्गुण ।
परेचे संपूर्ण घर केले ॥४॥

अर्थ :
ज्ञानाचा किंवा ध्यानाचा व्यवहार हाच कोणी पट आहे. अशी कल्पना केली तर त्याला तंतू जर कोणी असेल तर तो मनाचाच आहे. आणि त्या पटावर हरिनाम वाणीचा सोंगट्याचा खेळ आहे. स्वरुपप्राप्तीची इच्छा जर असेल तर भगवन्नामाच्या उच्चाराची चार पुष्पे मांडावी. असी खूण जाणणारा नाममंत्राचे माप टाकणारा फार विरळा. असा मापारी त्रिगुणाचे सवडीत न लपता तिला उलथी करुन एकरुपाने श्रीहरिच्या पंक्तिस भोजन करतो. मी तत्त्वतः ज्ञानरुप वाणीचे जे मुख्य घर निर्गुण परमात्माच केले आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग