तुम्हावीण कोणा सत्ता
641.
तुम्हावीण कोणा सत्ता ।
आहे अनंता यदर्थी ॥१॥
जन्ममरणा हरुनिया ।
करी निज छाया कृपेची ॥२॥
कोण ऐसा आहे त्राता ।
भयभवहर्ता तुजवीण ॥३॥
निळा म्हणे म्हणोनि आलो ।
तुमचा झालो शरणागत ॥४॥
641.
तुम्हावीण कोणा सत्ता ।
आहे अनंता यदर्थी ॥१॥
जन्ममरणा हरुनिया ।
करी निज छाया कृपेची ॥२॥
कोण ऐसा आहे त्राता ।
भयभवहर्ता तुजवीण ॥३॥
निळा म्हणे म्हणोनि आलो ।
तुमचा झालो शरणागत ॥४॥