वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 141. चोवीस नामांचा महिमा

येई वो अच्युते नामाम

🙏 4. संत नामदेव · ABH-083555 · अभंग क्र. ६४०

640.
येई वो अच्युते नामामृत रसे | सुंदर डोळसे जान्हवीये ॥१॥
अमृताची खोटी अच्युत नाम पेठी | पावे जगजेठी अच्युत सार ॥२॥
अच्युत अच्युत नामे हेंचि सत्य | हे पियूष त्वरित उच्चारिता ॥३॥
वैकुंठीची मूर्ति अच्युतनाम पाठे | प्रत्यक्ष वो भेटे विटेवरी ॥४॥
पुंडलिक दृष्टी नयनाची भेटी | निवारिता दृष्टी न्याहाळीता ॥५॥
नामा म्हणे अच्युत नाम हेंचि आम्हा | दिननिशी राम जपतसे ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग