गरणे पेरणे जन्म उगवण
1653.
गरणे पेरणे जन्म उगवणे | मायेची ते खूण सांगितली ॥१॥
संग तुझा पुरे संग तुझा पुरे | संग तुझा पुरे नारायणा ॥२॥
तू तरी न मरे मी तरी न पुरे | भक्ति हे संचरे हाचि लाभु ॥३॥
नामा म्हणे माझ्या ठायचा मी नेणे | संसार भोगणे तुझी लाज ॥४॥
