छंदिस्त है मन माझे प
1663.
छंदिस्त है मन माझे पंढरिनाथा | न सोडी सर्वथा पाय तुझे ॥१॥
यासि काय करू सांगा जी विठ्ठला | स्नेह का लाविला पूर्वीहूनि ॥२॥
कासवीची पिली सोडोनि निराळी | दृष्टि पान्हाइल अमृतमय ॥३॥
तैसा मी जवळुनि असेन वे दुरी | दृष्टि मजवरी असो द्यावी ॥४॥
तान्हे तछ घरी धेनु चरे बनी| हंबरे क्षणक्षणा परतोनि ॥५॥
नामा म्हणे देवा सलगी करी निकट | झणे मज वैकुंठ पद देसी ॥६॥
