मी तो तुझा दास न करी
1657.
मी तो तुझा दास न करी उदास । मायामोहपाश तोडी देवा ॥१॥
प्राण जावो परी नको करू त्याग । करी अंगसंग अंगिकार ॥२॥
अंगीकारी आता अजामेळ अंती । समान श्रीपती सम करी ॥३॥
नामा म्हणे ऐसे वर्णावे म्या किती । नामे केली ख्याति चराचरी ॥४॥
