कागदीचे वित्त वेश्ये
1634.
कागदीचे वित्त वेश्येसी दिधले | तैसे आम्हा केले नारायणे ॥१॥
जोडोनिया हस्त केले मढयापाशी | तैसे तू मजशी केले देवा ॥२॥
कडू भोपळयाचा कोणता उपयोग | तैसे पांडुरंगे केले जाण ॥३॥
नामा म्हणे ऐसे करू नको देवा | समागम व्हावा पायांसवे ॥४॥
