आम्ही शरणागती सांडिल
1632.
आम्ही शरणागती सांडिली वासना | ते त्वा नारायणा अंगिकारिली ॥१॥
म्हणोनि प्रसन्न व्हावया आमुते | वोसरल्या चित्ते चालविसी ॥२॥
अज्ञान बाळकु ठकविला धुरू | तैसा मी अधिरू नव्हे जाण ॥३॥
लंकापति केला तुवा बिभीषण | झालासी उत्तीर्ण वाचाऋणे ॥४॥
उपमन्ये घेतला दुधाचाचि छंद | तैसा बुद्धिभेद नव्हे जाण ॥५॥
नामा म्हणे तैसा नव्हे मी अज्ञान | माग तुज देईन शरीर अवघे ॥६॥
