वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

संतचरणी सेवा घडे । भ

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085990 · अभंग क्र. १६४७

1647.
संतचरणी सेवा घडे । भाग्य पहा हो केव्हढे ॥१॥
व्यर्थ शिणती बापुडे । योग याग करुनी गाडे ॥२॥
संतचरणी जे विन्मुख । स्वप्नी न देखती सुख ॥३॥
संतचरणी नाही थारा । भरले तपांच्या डोंगरा ॥४॥
नाम न म्हणती कोंडें । धूम्रपान करिती तोंडे ॥५॥
एका जनार्दनी साचे । मन नाही सुख कैचें ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग