बकाचिये परि ध्यान नक
1635.
बकाचिये परि ध्यान नको धरु । जीवेभावें धरु संतचरण ॥१॥
मग ते तात्काळ करिती पावन । ऐसे अनुमोदन आहे शास्त्रीं ॥२॥
ध्यानाचे ध्यान संतांचे चरण । काया वाचा मन दृढ ठेवी ॥३॥
वाच्य ते वाचक संत ते व्यापक । एका जनार्दनी देख अंतर्बाही ॥४॥
