तापलीया तापत्रयें सं
1649.
तापलीया तापत्रयें संता शरण जावे । जीवेंभावें धरावें चरण त्यांचे ॥१॥
करुनि विनवणी वंदु पायवाणी । घालु लोटांगणी मस्तक हे ॥२॥
उपासनामार्ग सांगती ते खुण । देती मंत्र निर्वाण विठ्ठल हरि ॥३॥
एका जनार्दनी संतासी शरण । रात्र आणि दिन चिंतूं त्यासी ॥४॥
