समसृष्टीं । म्हणो नय
1636.
समसृष्टीं । म्हणो नये थोर सान । ऐसे उपदेशी ज्ञान । आपण ही गोष्टीं ॥१॥
काया वाचा मने भावे । संतांशीं शरण जावे । संगती ते जीवेंभावें । अंतरीची गोष्टी ॥२॥
पूर्ण बुद्धिचाची रावो । पापपुण्य नाही ठावो । साधु संतांसी भजावो । मुख्य ही गोष्टी ॥३॥
ऐसिया संतांसी जाण । शरण एका जनार्दन । घालीतसे लोटांगण । मुख्य ही गोष्टी ॥४॥
