तीर्थाटन गुहावास । श
1657.
तीर्थाटन गुहावास । शरीरा नाश न करणे ॥१॥
समागम संतसेवा । हेंचि देवा आवडते ॥२॥
करिता रामनाम लाहो । घडती पाहाहो धर्म त्या ॥३॥
सकळ कर्मे जाती वाया । संतपायां देखता ॥४॥
एका जनार्दनी होता दास । पुरे आस सर्वही ॥५॥