दास जाल्यावरी करिसी
1635.
दास जाल्यावरी करिसी उदास | मनी ते तुम्हांस आणी देवा ॥१॥
सोशिले प्रवास जन्मजन्मांतर | करिसी अव्हेर आम्हांलागी ॥२॥
भार खांद्यावरी घेऊनी हिंडवी | होसी मजविशि पाठमोरा ॥३॥
श्रांत सावकाश गाती इतिहास | काय कासाविस होय तुम्हा ॥४॥
नामा म्हणे नको वाउगे उदीम न सोडी मी नाम केल्या कांही ॥५॥
