साचपणे ब्रीद सोडविन
1641.
साचपणे ब्रीद सोडविन तुझ्या | आता केशिराजा पण हाचि ॥१॥
लबाड तू देवा लबाड तू देवा | लबाड तू देवा ठावा आम्हा ॥२॥
काय मूर्खपणे सांगशिल गोष्टी | थोरपणे मोठी पुरे आता ॥३॥
नामा म्हणे काय खवळिसि आम्हा | लाज नाही तुम्हा कवणेविसी ॥४॥
