काय थोरपणा मिरविसी व
1643.
काय थोरपणा मिरविसी व्यर्थ | खोटेपणा स्वार्थ कळो आले ॥१॥
हिता अनहिता केले आपस्वार्थ | वचन यथार्थ बोल आता ॥२॥
होसी कालिमाजी कलिसारिखाची | भोळया भाविकाच्या भक्तिकाजा ॥३॥
नामा म्हणे माळ घातली स्वहस्ते | करितोसि दंडवत निमित्यासी ॥४॥
