वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 189. दास्य शरणागत स्थिती

आम्ही शरणागत परि सर्

🙏 4. संत नामदेव · ABH-082339 · अभंग क्र. १६३३

1633.
आम्ही शरणागत परि सर्वस्व उदार | भक्तीचे सागर सत्वशील ॥१॥
काया वाचा मने अर्थ संपत्ति धन | दिधले तुजलागुन पांडुरंगा ॥२॥
आम्हा ऐसे चित्त तुम्हा कैचे देवा | हा बडिवार केशवा न बोलावा ॥३॥
सत्वाचा सुभट बळि चक्रवति | पहा केवढी ख्याति केली तेणे ॥४॥
त्रिभुवनीचे वैभव जोडिले ज्या लागुनि| ते शरीर तुझ्या चरणी समर्पियेले ॥५॥
रावणा ऐसा बंधु सांडूनि सधर | ओळंगति परिवार ब्रह्मादिका ॥६॥
ते सांडोनि एकसरा आलासे धांवत | जाला शरणागत बिभीषण ॥७॥
हिरण्यकश्यप तुझ्या वैर संबंधे | पाहे त्या प्रल्हादा गांजियेले ॥८॥
अजगर कुंजर करिता विषपान | परि तुझे स्मरण न संडीच ॥९॥
पति पुत्र स्नेह सांडोनि गोपिका| रासक्रीडे देखा भाळलिया ॥१०॥
एकी तुझे ध्यान करिता त्यजिले प्राण | सांग ऐसे निर्वाण कवणे केले |॥११॥
ऐसे मार्गे पुढे जाले असंख्यात | भक्तभागवत सखे माझे ॥१२॥
त्यांचिनि सरता झालासी त्रिभुवनी | विचारी आपुल्या मनी पांडुरंगे |॥१३॥
केले उच्चारणे बोलता लाजिरवाणे | हांसती पिसुर्णे संसारींची ॥१४॥
नामा म्हणे केशवा अहो शिरोमणी | निकुरा जाल झणी मायबापा ॥१५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग