वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 190. प्रेम कलह

देवा तू प्रथम कर्म भ

🙏 4. संत नामदेव · ABH-082696 · अभंग क्र. १६५२

1652.
देवा तू प्रथम कर्म भोगिसी | सागरी जळचरू मछ जालासी |कमठे पाठी न संडी कैसी | कर्मो कासाविसी केले तुज ॥१॥
अपवित्र नाम आधी वराह | याहुनि थोर कूर्म कांसव |अर्ध सावज अर्ध मानव | हे भवभाव कर्माचे ॥२॥
खुजेपणी बळीसी पाताळी घातले | तेणे कर्मो तयाचे द्वार रक्षिले |पितयाचे वचनी मातेसी वधिले | ते कर्म जडले परशुरामा ॥३॥
श्रीरामा जाल्या आपदा बहुता | कमै भोगविले अंतरली सीता |भालुका तीर्थी वधियेले अवचिता | नाम अच्युता तुज जाहले ॥४॥
ऐसा कष्टी होउनि बोध्य राहिलासी | तू कलंकी या लोका भारिसी |आपल्या दोषासाठी आणिका दंडिसी | निष्कलंक होसी नारायणा ॥५॥
ऐसा तू बहुता दोषी बांधलासी | पुढीलाची जन्मे अवगतोसी |विष्णुदास नामा म्हणे हृषिकेशी | तुझी भीड कायसी स्वामियाहो ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग