तुझा माझा देवा का रे
1636.
तुझा माझा देवा का रे वराकार | दुःखाचे डोंगर दाखविशी ॥१॥
वळे बांधोनिया देसी काळा हाती | ऐसे काय चित्ती आले तुझ्या ॥२॥
आम्ही देवा तुझी केली होती आराधना | न म्हणे हरपिले आम्ही भाने ॥३॥
नामा म्हणे देवा करू नाथा गार्हाणे | नाही तरी जीव व्यथा साहाता ॥४॥
