भुक्तिमुक्तीचें सांक
1659.
भुक्तिमुक्तीचें सांकडें नाही विष्णुदासां । प्रपंचाची आशा मा तेथे कैची ॥१॥
वैकुंठ कैलास अमरपदें तिन्ही । तुच्छवत मनी मानिताती ॥२॥
राज्य भोग संतती संपत्ति धन मान । विष्ठेंअतें समान श्वान सुकर ॥३॥
मा ब्रह्माज्ञाना तेथे कोण पुसे तत्त्वता । घर रिघोनि सायुज्यता येत असे ॥४॥
एका जनार्दनी नामाची प्रौढी । ऋद्धिसिद्धि दडी घरी देती ॥५॥
